आविष्कार संस्थेला भेट

माय राजापूर या चळवळी विषयी कोणाला तरी जाणून घ्यावसं वाटतंय हेच माझ्यादृष्टीने विशेष होता. सामाजिक संस्थांविषयी जाणून घेण्यासाठी सहली निघतात याचं आश्चर्य वाटलं,माय राजापूरच्या सदस्यांनी देखील इतर संस्थांना भेटी देऊन जाणून घ्यायला हवं असं वाटतं यानिमित्ताने

आविष्कार ही संस्था रत्नागिरी येथे मानसिकदृष्ट्या दिव्यांग मुलांसाठी श्री.शामराव भिडे कार्यशाळा चालवते. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीची धडपड आणि आपलं पण या जगात काहीतरी अस्तित्व आहे हे सिद्ध करण्याची मुलांना संधी मिळावी यासाठी इथली मुलं विविध वस्तू बनवतात..याच कलाविष्कारांतर्गत दिवाळीसाठी पणत्या,कंदील, उटणं, रंगीत पणत्या इत्यादी विविध वस्तूंची निर्मिती या मुलांनी केली होती.

       राजापुरात या विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तू ग्राहकांना पुरवण्याची जबाबदारी #मायराजापूर चे श्री.केदार साने यांनी उचलली. ऑर्डर घेणे त्यांनतर आलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोचवणे हे काम सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने श्री. साने यांनी उत्तमपणे पार पाडले. 6000₹ पेक्षा जास्त रक्कमेच्या वस्तू राजापूरमध्ये विकल्या गेल्या आणि आविष्कारच्या विद्यार्थ्यांना एक दाद मिळाली. सामाजिक बांधिलकीचा माय राजापूरने घेतलेला वसा असा विविधांगी उपक्रमांमधून समाजापुढे येतोय.

नित्यानंद पाटील, प्रदीप कोळेकर,परेश भोसले,संदीप देशपांडे, शेखर पाध्ये, अजित हर्डीकर, दत्ताञय रानडे, सचिन चव्हाण,तुषार बावडेकर,पराग मोदी,अोंकार चव्हाण,केदार साने,प्रदीप भाटकर, सौ.श्वेता आंबेकर, यशोधरा पाटणकर,श्रृती ताम्हनकर, श्रावणी सप्रे, नम्रता पाटणकर या सर्वांनी  माय राजापूरच्या या सामाजिक कार्याला हातभार लावल्यामुळे दिव्यांग मुलांची ही दिपावली आपल्या

खरेदीने प्रकाशमान होईल यात शंका नाही

“एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ”