कोरोना(WORK IN LOCK DOWN PERIOD)

दि.२३/०५/२०२० रोजी जुवाठी पुजारे वाडीतून श्री. मोहन पुजारे यांचा फोन आला, त्यांची काही माणसे मुंबईहुन गावात येणार आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी प्राथमिक शाळेत जागा नाही, त्यांच्या राहत्या घरात केलं तर सुरक्षित अंतर पालन करणं कठीण तर आमच्या बागेतील घरात त्यांची सोय करता येईल का? त्यावर मी आमच्या बागेतील मुलाला विचारून त्याच्याकडेच निरोप पाठवतो असे सांगितले व फोन ठेवला.

      बागेत आम्ही दोन छोटी घरे बांधली आहेत एकात आमच्या बागेत काम करणारा संतोष राऊत राहतो व दुसरे खास आमच्यासाठी आमच्या मित्रमंडळी साठी राखीव.हे घर म्हणजे जांभ्या चिऱ्याच्या भिंती, त्यावर चौपाखी छप्पर, मातीची जमीन व दोन्ही बाजूला (पुढे व मागे) व्हरांडा (पडवी सारखा) हे घर माझं खूप आवडतं आहे, मोकळा निवांत वेळेच्या विरंगुळ्याचे ठिकाण आहे.

          दुसऱ्या दिवशी संतोषला फोन करून त्याची भूमिका जाणून घेतली तर त्याची यासाठी तयारी दिसली त्यामुळे या  काळात त्याने कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती दिली, त्याच्या ताब्यातिल घरात त्यांना वावर करू ध्यायचा नाही व  त्याकालावधीत त्याने दुसरीकडे जेवायचे व झोपायचे या बाबीवर आमच्यासाठी असलेले घर त्यांना ध्यायचे ठरवून तसा निरोप दिला.

         मंगळवार दि.२६/०६/२०२० रोजी मुंबईतील ही मंडळी निखरे प्राथमिक आरोग्य  केंद्रात तपासणी करून राहायला आली आहेत. “माय राजापूर” संस्थेच्या वतीने आम्ही त्यांची सोय करून दिली त्यामुळे काही प्रमाणात का होईना त्यांची करोना विषयक आपल्याच माणसाची भीती कमी होण्यासाठी उपयोग होईल अशी आशा वाटतेय. करोनाचा प्रादुर्भाव व करोना झाला तर त्यातून सुखरूप बाहेर येण्यासाठी करोनाची अनाठायी भीती कमी झाली पाहिजे म्हणून “माय राजापूर”संस्थेच्या वतीने उचलेले हे पाऊल  आशादायक ठरावे ही इच्छा.

मा तहसीलदार राजापुर यांनी केलेल्या मदतीच्या आव्हानानुसार  वाटुळ येथील मराठी शाळेत असलेल्या आपद्ग्रस्त 22 कामगारांसाठी मदत म्हणून किराणा सामान माय राजापुर।  संस्थेतर्पे तहसीलदार राजापुर यांना सुपूर्द करण्यात आले आहे यावेळी जगदीश पवार संदीप देशपांडे  दिनेश मांडवे आणि प्रदीप कोलेकर उपस्थित होते

1) कोंडये येथील मनीषा शिवगण यांना “माय राजापूर”कडून किराणा सामान देण्यात आले.

वात्सल्य मंदीर  बालगृहाचे अध्यक्ष

डाॅ.गुजर सर यांनी पाठवलेले साहीत्य मिळाल्याचे व आभाराचे पत्र.