छायाचित्र प्रदर्शन


पहिले छायाचित्र प्रदर्शन

दुसरे छायाचित्र प्रदर्शन

तिसरे छायाचित्र प्रदर्शन

राजापूर-लांजा नागरिक संघ मुंबई आयोजित “ग्रामीण साहित्य संमेलन” नाटे येथे १ व २ फेब्रुवारी २०२० रोजी संप्पन झाले. या संमेलनात “माय राजापूर” तर्फे पर्यटन विषयावर छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले होते. प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला. या ग्रामीण साहित्य संमेलनात दि.१/०२/२०२० रोजी रात्री ९.०० वाजता कविता वाचन कार्यक्रमात सर्व श्री. संजय गोरे, समीर देशपांडे या माय राजापूर सदस्यांनी कविता सादर केल्या व मुक्री यांनी गझल सादर केली.
आज रविवार दि.२/०२/२०२० रोजी “माय राजापूर” संस्थेला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले , व माय राजापूर आयोजित क्लिक राजापूर, फ्लॅश राजापूर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माय राजापूर दालनात करण्यात आला.
*सदर प्रदर्शन “माय राजापूर” चे श्री. परेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आले, त्यामुळे त्यांचे विशेष आभार.* प्रदर्शनातील फोटो व्यवस्थित लावले जाण्यासाठी श्री. हृषिकेश कोळेकर याने विशेष मेहनत केली (फोटो कसे लावायचे ते फ्रेम वर्क तयार केले) व माझ्यासह, संदीप देशपांडे, केदार साने, चंद्रशेखर सिनकर,प्रदीप कोळेकर(१८”x१२” आकाराचे 43 फोटो चा खर्च देणगी म्हणून केला) नित्यानंद पाटील,समीर देशपांडे,साहिल मुक्री, संजय गोरे श्रीम.प्रनोती भोसले, सुधाताई चव्हाण, सौ. मनीषा गवाणकर यांनी मदत केली.