शैक्षणिक आणि कौटुंबिक मदतकार्य

दोन निराधार भावंडांची माय बनत आहे ‘माय राजापुर’
आपण समाजात जगत असताना संवेदनशील मनाला सतत परिसरातील वेदनांची जाणीव होत असताना मन अस्वस्थ होत राहते.कधी कधी ही जाणीव इतकी तीव्र होत जाते की मग या अस्वस्थतेतुन जन्म घेते एक ‘ सामाजिक कार्य’…
आयुष्यात प्रत्येक व्यक्ति समाजात जगत असताना आपल्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ करत असताना जगलेल्या क्षणांचे उत्तरदायित्व व्हावे या हेतुने मग आपण नकळत समाजशील होत जातो.मग या उत्तरदायित्वाचे स्वरूप सेवा,कलार्पण, साहित्यार्पण, मदत,आयुष्यातला वेळ,मार्गदर्शन अशा विविध अंगानी उमलत राहते.समाज यातूनच उभा राहत असतो.सामाजिक आंतरक्रियेचे हे अतिउच्च रूप ज्या समाजात विकसित होते तो समाज विकसित होतो आणि पर्यायाने ते राष्ट्र उभे राहते.राष्ट्रीय कार्याचेच हे एक रूप आहे
माय राजापुर या संस्थेमार्फत अशाच स्वरूपाचे कार्य आपण करत आहोत.

2016 हे वर्ष त्यांच्या आयुष्यात अंधार घेऊन आले आहे याची पुसटशी जाणीव सुद्धा त्या निष्पाप मुलांना नव्हती, काळ इतका क्रूर असतो अथवा वागु शकतो याचा प्रत्यय त्यांना 2016 या वर्षात आला.
श्री. गंगाराम अनंत भितळे
भितळेवाडी,वाकेड लांजा यांचे कुटुंब…..त्यांची पत्नी आणि एक मुलगा,एक मुलगी असा संसार …..मुलांना लहानपणापासुनच गरीबीचे चटके बसतच मुले शाळेत शिकत होती, वडील मोलमजूरी करत होते आणि आई सुद्धा जमेल तसा संसाराला हातभार लावत होति.
खुपदा मिळणारी मजूरी आणि महिन्याचा खर्च यांचा ताळमेळ बसत नव्हता,काहीवेळा मग मुलांना उपाशिच झोपावे लागत होते..उपाशी राहून जमेल तस आयुष्य जगत असतानाच त्यांच्या संसारावर काळरूपी नाशिबाने घाला घातला आणि 2015 साली ‘ गंगाराम भितळे यांचे निधन झाले….
संसाराचा गाड़ा त्यांची पत्नी सुहासिनी गंगाराम भीतळे यानी पुढे हिम्मतिने चालू केला…पण नियतिच्या मनात काही वेगळेच होते…सुहासिनी भीतळे यांची तब्बेत बिगड़त गेली आणि……
2016 साली त्या आजारात त्यांचे दुखद निधन झाले….
दोन मुले… प्रथमेश आणि प्रणाली….निराधार झाली.
प्रथमेश त्या वेळी इयत्ता 9 वी च्या वर्गात आदर्श विद्यामंदिर वाटूळ येथे शिक्षण घेत होता,तर प्रणाली तिथेच इयत्ता 8 वी मध्ये….
माय राजापुर च्या सदस्यांनी भीतळे कुटुंबाला भेट दिली तेव्हा सर्वच सदस्य अचंबित झाले अशा परिस्थितिमध्ये ही दोन भावंडे जगत होती…. घरामध्ये लाईट नव्हती,चुलत्यांच्या आणि त्यांच्या सामायिक घरातील एका खोलीत या दोघांचा संसार चालू होता….एक वेळ जेवण मिळाले तर मिळाले नाहीतर नाहीच अस जमेल तस उपाशी राहून पुढील शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा प्रखर होती..
प्रणाली आणि प्रथमेश चुलीवर स्वतः जेवण करुन जेवत होती…कुणाचा फारसा आधार नव्हता …जेवण झाले की रात्रि दिवा लावून जमेल तसा अभ्यास…शाळा 4 किलोमीटर दूर …रोज चालत जावून चालत यायचे…अतिशय खड़तर परिस्थिति…चुलति जे काही जेवण जमेल तस देत होती त्यावर उदरनिर्वाह चालू होता.
शेवटी माय राजापुरच्या सर्व सदस्यानी प्रथमेश आणि प्रणालीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घ्यायचे निश्चित केले….
प्रथमेशचे चुलते आणि त्यांची दोन मुले मुंबई येथे वस्तव्याला आहेत.प्रथमेश आणि प्रणाली ज्या सामायिक घरामध्ये राहतात त्याच घरात त्यांची चूलती, तिची सुन आणि सुनेची छोटी दोन मुले ….त्यांच्या घरामध्ये लाईट आहे मात्र प्रथमेश आणि प्रणालीच्या खोलिमध्ये लाईट नव्हती….हे दुर्दैव…
मुलांची नावे आणि माहिती
पूर्ण पत्ता-
कु.प्रथमेश गंगाराम भीतळे
मु.पो.वाटूळ (बोरथड़े फाटा)
खालची वाडी
तालुका-लांजा
जिल्हा-रत्नागिरी
1)कु.प्रथमेश गंगाराम भीतळे
इयत्ता 10 वी
इयत्ता 9 वी मध्ये 70℅ गुण प्राप्त
शाळा-आदर्श विद्यामंदिर वाटूळ,लांजा
जन्मतारिख-31/10/2001
2)कु. प्रणाली गंगाराम भीतळे
इयत्ता 9 वी
इयत्ता 8 वी मध्ये 60℅ गुण प्राप्त
शाळा-आदर्श विद्यामंदिर वाटूळ,लांजा
जन्मतारिख-16/12/2003
इच्छुक समाजप्रेमी दात्यांना मदत करावयाची झाल्यास बैंक detail
Prathamesh gangaram bhitale
BANK OF INDIA, VATUL
AC. NO. *143310510003851
( माय राजापुर संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपण मदत करु शकता)
आई वडील हयात नाहीत..
घर-सामायिक मालकीचे
सामायिक शेती-थोड़ी आहे.
माय राजापुर या संस्थेमार्फत केलेली मदत आणि सध्या करत आहोत त्या मदतीचे स्वरूप असे आहे
१) गेली 2 वर्ष प्रथमेश आणि प्रणाली यांच्या उदरनिर्वाहाचा महिन्याला लागणारा खर्च संस्था करते.
२) मा. करंगुटकर साहेब, प्रांत, राजापुर यांच्या माध्यमातून वेगळे रेशन कार्ड मिळवून दिले.
३) माय राजापुर संस्थेने सर्व कागदपत्रे पूर्तता करुन संजय गांधी निराधार योजनेन्तर्गत दोन्ही मुलांना पेंशन योजना चालू करुन दिली आहे. त्या माध्यमातून महिन्याला 900 रुपये मुलांच्या बैंक खात्यामध्ये जमा होत आहेत.
४) संसारउपयोगी आवश्यक साहित्य (भांडी,कपड़े,चादर अशा स्वरूपाचे) संस्थेमार्फ़त दिले आहे.
५) माय राजापुर संस्थेच्या प्रयतनातून राजापुरचे प्रान्त साहेब मा.श्री करंगुटकर साहेब यांनी सदर विद्यार्थ्यांना लाईट मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत,फिटिंग साहित्य प्रान्त साहेब यांनी दिले आहे.काही दिवसात लाईट व्यवस्था होईल.
६) वेळोवेळी प्रान्त करंगुटकर साहेब सदर विद्यार्थ्यांना ट्यूशन फि,खावू आणि इतर साहित्य देत असतात.
७) शैक्षणिक साहित्याचा या वर्षी पूर्ण खर्च संस्थेने केला आहे.
दातृत्वसंपन्न व्यक्तिन्ना एक विनम्र आवाहन
सदर मुलांना इयत्ता 10 वी नंतर भविष्यात शैक्षणिक खर्च जास्त असणार आहे.मदतिसाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तिन्नी माय राजापुर या संस्थेशी संपर्क करावा अथवा वरील पत्त्यावर थेट मूलांशी संपर्क करुन आपण आपली मदत देउ शकता.