शेतकरी मार्गदर्शन शिबिर

माय राजापूर संस्था,आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिर सप्पन-

आज दि.१९/१२/१९ रोजी “माय राजापूर” आयोजित “शेतकरी आंबा बागायतदार मार्गदर्शन शिबिर ” संपन्न झाले ,त्याला कोकण कृषी विध्यपीठाचे , उद्यान शास्त्र विद्यावाचस्पती(Phd) श्री. प्रदीप हळदवणेकर व कीटक शास्त्र विद्यावाचस्पती(Phd) श्री. संदीप गुरव ह्यांनी मार्गदर्शन केले.

जग झपाटयाने बदलतेय, प्रत्येक क्षेत्रात हा बदल दिसतोय, तसा शेतीतही बदल दिसतोय.पूर्वी शेतकरी विविध प्रकारची पिके घेत असे, धांण्याच्या बदल्यात दुसरे धान्य किंवा गरज भागवत असे. पूर्वी गरजा कमी असल्याने शेतीवर उपजीविका चालत असे. त्यावेळी भारतात ७०% लोक शेतीवर अवलंबून होते. आत्ता ते प्रमाण ५५% टक्के आहे,शेतीची होणारी विभागणी, पशुधनाची कमतरता, मोडकळीस आलेली एकत्र कुटुंब व्यवस्था ,नवीन काळातील वाढलेल्या गरजा व अपेक्षा बदलते हवामान व त्याचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे शेतीवर उपजीविका करणे अवघड झाले आहे. शेती मधून राजमार्ग जात नाही तर पाऊल वाटा जातात त्या आपण शोधल्या पाहिजेत व एकाच पिकाची शेती करण्याऐवजी एकात्मिक शेती पद्धती अवलंबली पाहिजे. भारतीय लोकांचा स्वतःवर फार कमी विश्वास असतो, त्याला दुसरा करतो ते फायध्याचे असे वाटते त्यामुळे ज्या भारताने जगाला सेंद्रिय शेती शिकवली त्यांनी पाश्चिमात्य रासायनिक शेती एकतर्फी स्वीकारली व आपले नुकसान केले, भविष्यात सेंद्रिय व रासायनिक अशी विज्ञानाधारीत ,अभ्यासपूर्ण शेती करणे गरजेचे आहे.बाजारात कोणत्यावेळी कोणत्या पिकाला मागणी आहे त्याचा अभ्यास करून पीक घेतले पाहिजे. कोकणात हापूस आंबा, काजू, रातांबी ,फणस ही फळझाडे चांगली होऊ शकतात, कोकणी हापूसला जगात तोड नाही. बाकीचे आंबे हे रसासाठी वापरले जातात पण हापूस हा कापून त्याच्या फोडी खाल्या जातात. जांभ्या (laterite soil) जमनीमुळे त्याला येणाऱ्या स्वादाला जगात तोड नाही असे विविधांगी मार्गदर्शन श्री. हळदवणेकर सरांनी केले.

श्री. गुरव सरांनी आंबा बागेत होणारे रोग, किडी यावर मार्गदर्शन केले. बागेत हवा खेळती राहण्यासाठी व सूर्यप्रकाश झाडांच्या पानावर पडण्यासाठी छाटणी व विरळणी करणे फार गरजेचे आहे असे सांगितले. पूर्वी सर्व पिकांवर एकच औषध तयार केले जाते पण आत्ता आंबा पिकावर कीटकनाशके फवारून ती योग्य की अयोग्य हे ठरवून खास आंब्यासाठी कीटकनाशके कोणती ती विध्यपीठात ठरविले जाते.कोकणी आंबा बागायतदार यांनी एकत्र येऊन फेडरेशन केली तर त्यांना हवामानाचा अंदाज घेऊन कोणत्या वेळी काय करावे याचे जागेवर मार्गदर्शन मिळू शकेल, असे मार्गदर्शन द्राक्ष, ऊस या संघटित शेतकऱ्यांना मिळत असते. आंबा बागायतदार यांनी एकत्र येऊन त्यासाठी दबाव निर्माण करून ,आंबा हे कोकणचे विशेष पीक आहे त्यासाठी संशोधन, मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे मार्गदर्शन केले.

त्यानंतर पवार बंधू यांच्या”राजांबा” बागेला भेट देऊन तेथे मार्गदर्शन केले.

या शिबिराला निमंत्रित शेतकरी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या व त्यांना पडलेले प्रश्न विचारून त्यावर सखोल चर्चा केली. हे शिबिर म्हणजे शेतकरी व शात्रज्ञ यांच्यातील मुक्त सवांद होता, विध्यापीठातील शात्रज्ञ व शेतात राबणारे शेतकरी यांचा ज्ञानाचा संगम होता.

शात्रज्ञ व शेतकरी यांच्या मनमोकळ्या चर्चे मुळे ह्या शिबिरातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले व विध्यापीठ व आमच्यात सुसंवाद निर्माण झाला व भविष्यात आमच्या शेतीतील अडचणीत विध्यापीठ आम्हाला मार्गदर्शन करेल असा विश्वास निर्माण झाला असे मत अनेक सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केले. आणि हेच मत आजचे शिबिर यशस्वी झाल्याचे निदर्शक आहे.

हे शिबिर”माय राजापूर”संस्था राजापूर यांनी आयोजित केले, त्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे कॉलेजचे प्राचार्य श्री. पवार सर यांनी हॉल उपलब्ध करून दिला, माय राजापूर चे सदस्य श्री. किरण कोळेकर यांनी अल्पोपहार, जेवण उपलब्ध करून दिले. व माय राजापूरचे अध्यक्ष श्री. जगदीश पवार व सदस्य श्री. प्रकाश सप्रे, श्री. चंद्रशेखर सिनकर,श्री. प्रदीप कोळेकर, श्री. हृषीकेश कोळेकर, श्री. मंदार ढवळे, श्री. साहिल मुक्री यांनी मोलाचे सहकार्य केले.

या शिबिराला सर्व श्री.निलेश आपटे, मंदार शेट्ये, सुहास पंडित, प्रभाकर आपटे, बंडूशेठ लेले, देवेंद्र शेट्ये ,जयंत कदम, निलाल हाकीम व इतर प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते.