निबंध स्पर्धा – (राजापूर हायस्कूल मर्यादित) – २०१७-१८

उद्देश:- राजापूरचा विकास करायचा असेल, विकासात्मक मानसिकता बदलायची असेल तर ज्यांच्या हातात देशाचे भविष्य आहे त्या विद्यार्थ्यांना सहभागी करून, त्यांची मत ऐकून व त्यातील नाविन्यपूर्ण कल्पना (ज्या आम्हाला सुचल्या नसतील) बघून सर्वांचा समावेश राजापूरच्या विकासात असावा या उद्दिष्टाने ही निबंध स्पर्धा “माय राजापूरने” आयोजित केली होती.
निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार दिनांक ०४/०१/२०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता कला मंदिर येथे राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. छाया जोशी व राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जोशी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व माय राजापूरचे श्री. संजय मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
इ. ८ वी ते १० वी यांच्यासाठी “आपल्या गावाजवळील पर्यटनस्थळे” ह्या विषयात
प्रथम क्रमांक- कु. शाल्मली प्रशांत पाध्ये
द्वितीय क्रमांक- कु. ओंकार विश्वनाथ मांडवकर
उत्तेजनार्थ- कु.गायत्री प्रसाद पळसुले-देसाई
कु. साहिल दिलीप घुमे
इयत्ता ११ वी व १२ वी यांच्यासाठी “राजापूरच्या भौगोलिक वैशिष्ट्यामधून रोजगार निर्मिती” ह्या विषयात
प्रथम क्रमांक- कु. साक्षी सचिन गुरव
द्वितीय क्रमांक- कु. श्रद्धा लक्ष्मण हळदणकर
शिक्षक वर्ग यांच्यासाठी “राजापूर काल, आज आणि उद्याच्या पर्यटन वाढीसाठी काय करावे” ह्या विषयात
प्रथम क्रमांक- श्री. मधुकर बाबुराव तोडकर
द्वितीय क्रमांक- सौ. अंतरा अभिजीत तेली यांचा आला, सर्व यशस्वी, सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे “माय राजापूर” आभारी आहे.
राजापूर तालुक्याचा शेती, फलोत्पादन व पर्यटन या माध्यमातून शाश्वत विकास होऊ शकतो यावर “माय राजापूर” संस्था काम करते, त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनामधून राजापूरचा विकासात्मक आराखडा तयार करताना उपयोग व्हावा व सर्वांची मते जाणून घ्यावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समारंभासाठी माय राजापूरचे श्री. जगदीश पवार, श्री. प्रदीप कोळेकर, श्री. नरेश दसवंत, श्री. धनंजय मराठे, श्री. संदीप देशपांडे, श्री. सुबोध कोळेकर, श्री. नित्यानंद पाटील, श्रीमती सुधा चव्हाण, श्री. सतीश रहाटे, शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्तीत होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. दत्तप्रसाद सिनकर यांनी केले तर प्रास्ताविक श्री. जगदीश पवार यांनी केले.