बातम्या

।। सन्मान समाजकार्याचा ।।
माय राजापूर संस्थेचे संस्थापक सदस्य ,प्रसिध्द फोटोग्राफर व्यावसायिक मा. प्रदिपजी कोळेकर यांनी माय राजापूर संस्थेचे दत्तक कुंटुबिंय श्री. गोविंद काळे रा. तिठवली धनगरवाडी यांची दोन्ही मुले संध्या व संदेश दिव्यांग आहेत . त्यांना मिळणारी तुंटपुंजी शासकिय पेंशन सहा महिन्यानंतर मिळणार होती परंतु संलग्न बॅंकखाते असल्याने घेता येत नव्हती ती मिळवून देण्यासाठी तळमळीने केलेली धडपड याची दखल रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्थेने घेऊन त्यांचा सन्मान रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्थेचे जिल्हायुवक अध्यक्ष श्री. वैभव कोकरे व तालुका अध्यक्ष प्रकाश झोरे यांचे हस्ते मा. जिल्हा उपाध्यक्ष श्री.विलास गोरे यांचे मार्गदर्शनानुसार नवयुग फोटो स्टुडिओ राजापुर येथे सदिच्छा भेट घेऊन करण्यात आला 💐💐💐💐💐💐💐

गोविंद काळे यांच्या पासबुकावर एनी वन ची नोंद