अंजनेश्वर मंदिर

श्री देव अंजनेश्वर :-
राजापूर महामार्गाने गोव्याकडे जाताना ८ कि. मी. वर हातिवले गावापाशी उजवीकडे वळून जैतापूर मार्गावर २३ कि. मी. वर मिठगवाणे फाटा लागतो तेथून डावीकडे ३ कि. मी. अंतरावर मिठगवाणे गावात श्रीदेव अंजनेश्वर मंदिर आहे.
चिरेबंदी नगारखाना असून त्या महाद्वारातून सरळरेषेत गाभार्‍यातील देवाचे दर्शन घडते. समोरच जांभ्या दगडात उंच दीपमाळा आहेत. मंदिराच्या सभोवार चिर्‍याची तटबंदी असून आतील प्रांगणात चिरेबंदी फरशी बसविलेली आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असून, सभागृह लाकडी खांबावर तोललेले चौपाखी छप्पराचे आहे. मंदिराचे शिखर अष्टकोनी  असून ते शिखरासारखे उंच परंतु कौलारू आहे. या मंदिराच्या बांधकाम शैलीवर गोमंतकीय प्रभाव असल्याचे जाणवते.
भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा अंजनेश्वर व आल्हाददायक निसर्गसौंदर्यामुळे मनाला प्रसन्नता लाभते.