ब्रिटीशकालीन पूल

अर्जुना नदीवरील ब्रिटिश कालीन राजापूर पूल :-
“स्थानिकांमध्ये वरच्या पेठेतील मोठा पूल म्हणून प्रसिद्ध आहे”. मुंबई गोवा हायवेवर राजापूर डेपो पासून गोवा बाजूला १.५० कि.मी. अंतरावर हा ब्रिटिश कालीन पूल आहे. पूलाची लांबी ६८.४० मीटर आहे, १०.१० मीटरचे ४ गाळे आहेत. पूलाचे खांब काळ्या दगडातील सुबक बांधकाम असून स्पॅन ड्रिल आर्चची रचना करून त्यावर स्लॅब केलेले असल्याने स्थापत्यदृष्ट्या या पूलाला फार महत्व आहे. १९३५ साली या पूलाचे काम सुरू झाले व १९४० साली पूल बांधून पूर्ण झाला. दोन दऱ्यांना जोडणाऱ्या या पूलामुळे निसर्ग सौंदर्यात कमालीची भर पडली आहे. आता नवीन होणाऱ्या चौपदरीकरणात Heritage Bridge म्हणून या पूलाचे जतन करणे हे सर्वच स्थापत्य प्रेमींचे कर्तव्य आहे.