दांडे समुद्रकिनारा

दांडे समुद्र किनारा :-
राजापूर डोंगर मार्गे अणसुरे दांडे हे अंतर ३० की.मी. असून सागरी महामार्गालगत हा समुद्र किनारा आहे. समुद्रकिनाऱ्यावरून समोर विजयदुर्ग किल्ला दिसतो, येथील वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील ठाणे नंतरचे सर्वात मोठे कांदळवन अणसुरे येथे आहे. माडाची झाडे, कौलारू घरे व दांडे पूल यामुळे इथला परिसर विलोभनीय दिसतो.