इंग्रजांची वखार

इंग्रज वखार (English Factory) :-
इंग्रजांनी इ. सन १६४९ मध्ये राजापुरात व्यापारासाठी वखार (English Factory) बांधली व कोकणात व्यापार सुरू केला. सिद्धी जोहरने १५ मार्च १६६० रोजी पन्हाळगडाला वेढा घातला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यातील करारातील अटी व शर्ती मोडून तोफा पुरविल्या व यूनियन जॅक फडकवून पन्हाळगडावर तोफांचा मारा केला. या गोष्टींचा महाराजांना प्रचंड राग आला व पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर इ. स. १६६१ मध्ये इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी महाराज राजापुरात आले होते व इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करून वखार लुटली होती.
१८१८ मध्ये आपला देश पुर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यापूर्वी १५० वर्षे अगोदर महाराजांनी समुद्रमार्गे येणाऱ्या पोर्तुगीज, डच, व इंग्रज यापासून स्वराज्याला धोका आहे हे ओळखले व स्वराज्याचे आरमार स्थापन करून स्वराज्य बळकट केले. ज्या इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले त्या इंग्रजांना महाराजांनी ओळखले व त्यांच्या राजकीय हस्तक्षेपाला सडेतोड उत्तर दिले. अशा महाराजांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेली इंग्रज वाखारीची इमारत धोकादायक झाली म्हणून सन २००४ साली जमीनदोस्त करण्यात आली व राजापूरचा ऐतिहासिक वास्तु वारसा नाहीसा झाला.
छ. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतिक व ऐतिहासिक वास्तु वारसा जपण्याबरोबर पर्यटन वाढीसाठी इंग्रज वखार ज्या जागेवर होती तेथेच बाहेरून जुनी वखार जशी होती तशी बांधून आतील भाग हा समाजउपयोगी वापरात येईल यासाठी वखारीचे मूळ नकाशे (Drawing) प्राप्त करून जुने फोटोग्राफ अभ्यासून वखारीचे पुनर्निर्माण करण्याचा आराखडा तयार केला आहे, त्यामध्ये तळमजल्यावर २५० लोकांसाठी हॉल, पहिल्या मजल्यावर जुने दस्ताऐवज असलेले वस्तुसंग्रहालय (art gallery), प्रोजेक्टर रूम यांचा समावेश आहे. आजूबाजूचा परिसर गढी पद्धतीचे अस्तित्वातील बुरूज व तटबंदी प्रमाणे संरक्षित करून परिसराचे सुशोभीकरण करून स्थानीक रहिवाशांना संध्याकाळी फिरण्याचे ठिकाण होईल असा आराखडा बनविला आहे.

English Factory Plan Presentation