कार्यक्रम

21 वं शतक तंत्रज्ञानाचं शतक आहे.मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर तंत्रज्ञान अपरिहार्य झालंय.प्रत्येक व्यक्तीच्या हातात दिसणारा स्मार्टफोन आणि त्याच्या आजूबाजूला फिरणारं जग हे त्याचंच प्रतिक आहे.
मोबाईल-संगणक यांच्या वापरासाठी लागणारी भाषा आपल्या नेहमीच्या भाषेपेक्षा वेगळी असते.याच प्रोग्रामिंगची तोंडओळख विद्यार्थ्यांना शालेय वयातच झाली तर भविष्यात याचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर नक्कीच चांगला परिणाम होईल यात शंका नाही.
प्रोग्रामिंग/कोडींग करण्यासाठी लागणारी विचार प्रक्रिया विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती देखील अधिक समृद्ध करेल.
शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी सहज उपलब्ध असतात पण ग्रामीण भागात या गोष्टी तितक्या सहज उपलब्ध नाहीत,हाच विचार करून माय राजापूर ने Hour of Code हा कार्यक्रम आयोजित केला आहे.शनिवार दिनांक 11/12/2021 रोजी राजापूर हायस्कुल येथे आयोजित केला आहे.
तासाभरात विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंगची तोंडओळख,प्रत्यक्ष संगणकावर एका गेमच्या प्रोग्रामचं कोडींग अश्या स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल.
दिवसभरात पाच बॅचमध्ये हा कार्यक्रम होईल.इयत्ता 6 वी ते 9 वी चे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.सोयीप्रमाणे कुठल्यातरी एका बॅचमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.मर्यादित जागा असल्यामुळे आगाऊ नोंदणी आवश्यक आहे.कार्यक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
अधिक माहितीसाठी श्री.सिनकर सर (7798538794)या क्रमांकावर संपर्क साधावा.