HOUR OF CODE

Year 2019

“माय राजापूर”आयोजित HOUR OF CODE कार्यक्रम शनिवार दि.१४/१२/१९ रोजी नॅशनल इंग्लिश स्कूल, रानतळे येथे सप्पन झाला.

जागतिक स्तरावर HOUR OF CODE हा कार्यक्रम डिसेंबर महीन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केला जातो. मुलांमध्ये संगणक प्रोग्रामिंगची माहिती मिळावी, आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये सर्जनशीलता वाढावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला गेला, त्यासाठी scratch अप्लिकेशन वापरण्यात आले.त्यावर मुलांनी एका खेळाचे (game) प्रोग्रामिंग केले व कार्यक्रमाचा आनंद घेतला.

सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळी नॅशनल इंग्लिश स्कुल संचालक मंडळाचे इरफान चौगुले,समशुद्दीन काझी, शरपूद्दिन शेमना, शाळेचे मुख्याध्यापक इकबाल सर, संगणक तज्ञ संजीव सप्रे,( पुणे)

माय राजापूरचे अध्यक्ष जगदीश पवार, सदस्य संदीप देशपांडे, प्रदीप कोळेकर, दत्तप्रसाद सिनकर, परेश भोसले, सुबोध कोळेकर, हृषीकेश कोळेकर, वैभव गार्डी, साहिल मुक्री,शहेबाज दादन,समीर देशपांडे व विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर चोवीस मुलांच्या एक तासाच्या चार batch या प्रोग्रॅम साठी घेण्यात आल्या. एकूण ९६ मुलांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला व इतर मुलांनी त्याचा आस्वाद घेतला.

Hour of code कार्यक्रम आयोजनासाठी नॅशनल इंग्लिश स्कुलचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक इकबाल सर, संगणक शिक्षक संकेत सर, ढवळे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पडू शकला. “माय राजापूर”सर्वांचे आभारी आहे.

श्री. संजीवजी सप्रे हे या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून राजापूरला आले व सर्व तांत्रिक बाबीचे मार्गदर्शन केले त्याबद्दल “माय राजापूर” विशेष आभार मानते तसेच सर्व “माय राजापूर” सदस्यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचा वेळ देऊन कार्यक्रम यशस्वी केला म्हणून सर्वांचे आभार.

Year 2018

आज दि.९/१२/१८ रोजी  HOUR OF CODE कार्यक्रम खूप चांगला झाला, त्याबद्दल मी सर्व  सदस्यांचा आभारी आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना श्री. संजीव सप्रे यांनी मांडली व “माय राजापूर”सदस्यांनी ती उचलून धरली व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. या कार्यक्रमाची जबाबदारी श्री. सिनकर सर यांच्यावर  सोपवली व त्याला सौ. कोळेकर, सौ. बावधनकर

सर्व श्री. सुबोध,वैभव,हृषीकेश, केदार, कु.सानिका गोरे  हे स्वयंसेवक व सर्व श्री. प्रदीप कोळेकर, मांडवकर सर, सिनकर साहेब,संदीप देशपांडे, समीर देशपांडे,परेश भोसले, परवडे सर, प्रकाश झोरे ,संजय गोरे श्रीम. सुधा चव्हाण यांनी बाहेरील नियोजनाची जबाबदारी फार चांगली सभाळली ,श्री. सप्रे सरांचे सहकारी श्री. गणेश नवरे व श्री. संदीप पवार या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते व नियोजनात लक्ष देत होते. श्री. राजेश बाईत व सौ. छाया ताम्हणकर यांनीही व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून कार्यक्रमाला भेट दिली, माझा सहकारी साहिल मुक्री यानेही या कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून भाग घेतला , राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ, मुख्याध्यापक ,व सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.सर्वांच्या सहकार्याने राजापूरसाठी नाविन्यपूर्ण ,मुलांची शैक्षणिक गरज व भूक भागवणारा कार्यक्रम यशस्वी पार पडला हे मुलांच्या तन्मयतेने संगणकावर वेळेचे भान न ठेवता  काम करणे व बाहेर आल्यावर  चेहऱ्यावरील आत्मविश्वास पूर्ण  उत्साह ,हॉलिईटर्स च्या चेहऱ्यावरील कामाचे समाधान (job satisfaction) व त्यामुळे आम्हाला एक चांगला कार्यक्रम “माय राजापूर”संस्थेच्या माध्यमातून केल्याचे समाधान व अभिमान मिळालं हे वेगळं सांगायला नको. परत एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो .