जैतापुरचा पूल

जैतापूर पूल :-
राजापूर पासून ३० की.मी. अंतरावर जैतापूर हे गाव राजापूर खाडीवर वसलेले आहे. खाडी पलीकडे धाऊलवल्ली व नाटे ही गावे असून, सागरी महामार्ग करताना जैतापूर पूल बांधण्यात आला. पूलाची एकूण लांबी ४८० मीटर आहे. त्यात ६५ मीटरचे ४ गाळे, ३३ मीटरचे २ गाळे, ३२ मीटरचा एक गाळा व २२ मीटरचा एक गाळा असून १०० मीटरचा कमानीदार बॉक्स सेल आहे. पूलाचे काम २००४ साली सुरू झाले व २००९ मध्ये पूर्ण झाले. पूल व जोडरस्ते यासाठी २३.५० कोटी एव्हढा खर्च झाला. जैतापूर पूलामुळे आजुबाजूंच्या गावांना दळणवळणाची सोय तर झालीच पण येथल्या निसर्ग सौंदर्यात कमालीची भर पडली. सकाळी सूर्योदय व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पूलावरून विहंगम निसर्ग दृष्य दिसते.