जुवे बेट

जुवे बेट :-
जैतापूर, बुरंबेवाडी व धाऊलवल्ली यांच्या मध्ये जैतापूर खाडीत जुवे हे गाव आहे. चारही बाजूंनी समुद्रांनी वेढलेले हे गाव असून येथे जाण्यासाठी होडीतूनच प्रवास करावा लागतो. स्थानिक लोकांच्या इंजिनवर चालणाऱ्या होड्या असून त्यामधुनच गावकरी जैतापूर, बुरंबेवाडी व धाऊलवल्ली पर्यंत येतात व पुढील प्रवास गाडीतून करतात. पर्यटन दृष्ट्या या गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो.