कृषी पर्यटन केंद्र

कृषी पर्यटन केंद्र:-
राजापूर शहरापासून राजापूर नाटे आंबोळगड रस्त्यावर गणेश अँग्रो टुरिझम हे आंबोळगड जवळच आहे. राजापूर शहरापासून ३४ की.मी. अंतरावर असून ४० एकरच्या आमराईत वसविलेले आहे. उंच डोंगरावर वसविलेल्या पर्यटन केंद्राच्या ठिकाणाहून आंबोळगड समुद्र किनारा, नाटे मच्छीमारी होड्या, जैतापूर पूल हा सगळा परिसर न्याहाळता येतो. येथे निवास, न्याहरी व जेवणाची व्यवस्था आहे. लहानग्यांसाठी घसरगुंडी, बैलगाडी, माचाण याचीही व्यवस्था आहे.