माडबन समुद्रकिनारा

माडबन समुद्रकिनारा :-
अणुऊर्जा प्रकल्पामुळे जैतापुर व माडबन खूप प्रकाशझोतात आले. राजापूरपासून गोव्याकडे जाताना ८ कि.मी. वर हातिवलेला उजव्या बाजूला रस्ता जैतापूरला जातो. तेथून २५ कि.मी. वर डाव्याबाजूला माडबन फाटा जातो तेथून ५ कि. मी. वर माडबन समुद्रकिनारा आहे.
सुरूवातीला माडाचे बन त्याला लागूनच असलेले सुरूचे बन त्यानंतर पांढरी शुभ्र वाळू असलेला किनारा व वाळूतून स्वयंभूसारखे वरती आलेले जांभे दगड.
समुद्रावर फिरायला जाणारे येथे क्रिकेट खेळतात, पाण्यात डुंबतात व शेजारी असलेल्या गोड पाण्याच्या झर्‍यावर आंघोळ करून फ्रेश होतात. माडबन समुद्र किनार्‍यावरून विजयदुर्ग किल्ला दिसतो. इथल्या निसर्ग सौंदर्याने पर्यटक भारावून जातो.