मल्लिकार्जुन मंदिर

श्री मल्लिकार्जुन मंदिर :-
राजापूर पासून हातिवले जुवाठी मार्गे प्रिंदावण हे अंतर २० कि.मी. आहे. वाघोटण खाडीलगत असलेले हे निसर्गसुंदर गाव आहे. प्रिंदावण गावात श्रीमल्लिकार्जुन हे शंकराचे मंदिर आहे. सुमारे ४०० वर्षापूर्वीपासून हे मंदिर आहे. सध्या मंदिराची जी वास्तु आहे ती सेनापती बापू गोखले यांनी बांधलेली आहे.
सभागृह, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून, सभागृह लाकडी खांबावर महिरप कमान कोरून त्यावर चौपाखी पध्दतीचे छप्पर आहे. मंदिराचे शिखर हे पेशवेकालीन महाराष्ट्रीयन शैलीप्रमाणे आहे. शिखरावर चुनेगच्चीतील मूर्तिकला (स्टक्को आर्ट) असून वेगवेगळ्या मूर्ती शिखरावर बसविलेल्या आहेत.
मंदिराच्या समोरून एक ओढा वहातो. श्रावण महिन्यातील इथले निसर्गसौंदर्य खूपच मनमोहक असते.