मासेमारी (नाटे)

मासेमारी (नाटे):-
राजापूर शहरापासून राजापूर मुसाकाजी रस्त्यावर ३० की.मी. अंतरावर साखरी नाटे येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मच्छीमार समाज राहतो. त्यांना दालदी समाज असेही म्हणतात. साखरी नाटे हे मुख्य समुद्रापासून ३.०० की.मी. आत असल्याने माछिमारी नौकेला वादळाचा त्रास होत नाही व नौका सुरक्षित राहतात. जमिनीच्या तीव्र उतारावर अत्यंत दाटीवटीने वसलेली वसाहत, त्याला लागून असलेली खाडी व त्यात उभ्या केलेल्या नौका असे विहंगम दृष्य लांबून फारच विलक्षण वाटते.