पुंडलिक मंदिर

पुंडलिक मंदिर :-
अर्जुना नदीच्या पाण्यात मध्यभागी श्री शंकराचे मंदिर फार पुरातन असून पावसाळ्यात येणाऱ्या पूरामध्येही हे मंदिर आपले अस्तित्व टीकवून आहे. अडीच फुट रुंदीच्या भिंती व त्याला घुमट सदृश्य कळस व पाण्याच्या प्रवाहाचा मारा चुकविण्यासाठी होडीच्या आकाराचा चौथरा व चारही बाजूला पाणी हे दृश्य विहंगम असते. राजापुरात ज्या वेळेला गंगा येते त्यावेळी प्रथम उन्हाळेवर गरम पाण्याची आंघोळ करणे, त्यानंतर गंगेवर स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेऊन श्री. धुतपापेश्वरावर अभिषेक केल्यास काशी यात्रेची पूर्तता होते अशी राजापूरकरांची श्रद्धा आहे. पावसाळ्यात मोठ्या पूराच्या वेळी येथील दृश्य भीतीदायक असते पण कमी पाणी असताना हा परीसर म्हणजे नैसर्गिक सौंदर्याने भरून गेलेला असतो. गगनगिरी महाराज गंगा भेटीला येत त्यावेळी या मंदिराच्या त्रिकोणी चौथऱ्यावर बसून भक्तांना दर्शन देत असत.