सौंदळ धबधबा

सौंदळ धबधबा :-
राजापूरहून मुंबईकडे जाताना १३ कि. मी. वर उजव्या बाजूला रस्ता जातो. ८.०० कि.मी. वर सौंदळ या गावी डाव्या बाजूला साधारण ४.०० कि.मी. वर सौंदळ घागवाडी येथे हा निसर्गरम्य धबधबा आहे.
धबधबा उंच व रूंद आहे. खाली खोल डोह आहे. स्थानिक भाषेत त्याला ‘कोंड’ म्हणतात. त्यामुळे चांगले पोहणारेच स्नान करू शकतात. परिसर निसर्ग सौंदर्याच्या वैविधतेने नटलेला असल्याने, वनस्पती, पक्षी, प्राणी अभ्यासक येथे चांगलेच रमतात.