सवतकडा धबधबा

सवतकडा धबधबा :-
राजापूरहून मुंबईकडे जाताना १२.५० कि.मी. वर डाव्या बाजूला शिवणे हा रस्ता जातो तेथून ६.५० कि. मी. उजव्या बाजूला ४ कि.मी. अंतरावर चुनाकोळवण हे गाव आहे. तेथे गाडी लावून १.०० कि. मी. निसर्गरम्य वातावरणातून चालत गेल्यानंतर हा धबधबा लागतो.
मंदरूळ, वाटुळ, चुनाकोळवण परिसरात रांगोळीचा दगड मोठ्या प्रमाणात आहे. स्लेट टाइप दगडामुळे, दगडाचे वेगवेगळे टप्पे तयार होतात, त्यावरूनपडणारे पाणी आणि त्याचे सौंदर्य बघून आपण परदेशात तर नाही ना असे वाटावे असे अद्भूत सौंदर्य आहे. हा संपूर्ण भाग डोंगर दऱ्यांचा असल्याने एकाच ओढ्यावर ३-४ ठिकाणी छोटे मोठे धबधबे आढळतात. दाट झाडी, उंच सखल भू पृष्ठभाग यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने हा भाग अभ्यासण्यासारखा आहे.
पावसाळी पर्यटनाची तयारी असेल, आणि थोडी काळजी घेतली तर धबधब्यात मनसोक्त भिजता येते. पावसाचा जोर मात्र किती आहे याचे भान ठेवावे लागते.