शांतादुर्गा लक्ष्मीनृसिंह मंदिर

श्री शांतादुर्गा लक्ष्मीनृसिंह मंदिर :-
राजापूरहून गोव्याकडे जाताना २ कि. मी. अंतरावर डाव्या बाजूला उन्हाळे, दोनिवडे, रेल्वेस्टेशनकडून केळवली असा रस्ता जातो. केळवली गावात राजापूर पासून २५ कि. मी. अंतरावर श्रीशांतादुर्गा लक्ष्मीनृसिंह मंदिर आहे.
समस्त सप्रे परिवाराचे ते दैवत असून आधुनिक शैलीतील हे मंदिर स्थापत्य कला प्रेमींना प्रेरणा देणारे आहे.
मंदिराला चौरस आकाराचे सभामंडप, त्याला लोखंडी सांगाड्यावर आधारलेले चौपाखी छप्पर, अंतराळ व गर्भगृह असे आहे. गर्भगृहावरील शिखर नागर शैलीतले असले तरी वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात वास्तुरचनाकार यशस्वी झाला आहे. गर्भगृहात काळ्या दगडात मूर्ती व पाठीमागे कलाकुसर कमान एकाच दगडात कोरण्यात आलेली असून, नृसिंहाची मूर्ती आकर्षक आहे.