आमच्याविषयी

"माय राजापूर"

'राजापूर' सहयाद्रीच्या पर्वत रांगांपासून समुद्राला मिळणारा रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव तालुका. 'राजापूर' म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेल्या कोकणातला एक महत्वाचा तालुका. निसर्गसंपन्नतेसोबतच महत्वाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या राजापूरचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास व्हावा ही प्रत्येक राजापूरकरांची मनापासून इच्छा असते पण त्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज ओळखून आम्ही 'माय राजापूर' ही संस्था स्थापन करतोय अर्थात यासाठी आपण सर्व सन्माननीय राजापूरकरांचे सहकार्य व पाठिंबा मिळणे आवश्यक आहे व ते मिळेल याची आम्हाला खात्री आहे. शेती, फलोत्पादन आणि पर्यटन यातून रोजगारनिर्मिती होणे ही काळाची गरज आहे. हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून 'माय राजापूर' भविष्यात काम करेल, सोबतच गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरीबांना आरोग्य विषयक मदत, समाजसेवा या क्षेत्रात देखील काम करण्याचा मानस आहे. राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व राजापूरकरांच्या सहकार्याने सातत्यपूर्ण प्रयत्न करणे हे 'माय राजापूर' चे उद्दिष्ट आहे.
धन्यवाद!

माय राजापूर (वेबसाईट टीम )

Sanjeev Sapre

संजीव सप्रे

राजापूर हायस्कूलचे माजी विद्यार्थी.सध्या पुणे येथे माहिती तंत्रज्ञान विषयात कार्यरत.माय राजापूरची वेबसाईट तयार करण्यात सुरुवातीपासून महत्वपूर्ण योगदान

Sanddep Pawar 01

संदिप पवार

पेशाने आर्किटेक्ट,सध्या व्यवसायानिमित्त मुंबईत.मूळ गाव राजापूरबद्दल असलेल्या आत्मियतेतून माय राजापूरसाठी कार्यरत

Jagdish Pawar 01

जगदीश पवार

स्थापत्य अभियंता म्हणून सरकारी सेवेतून स्वेच्छानिवृत्त.पर्यटन,फोटोग्राफी करताना मायराजापूर ही संस्था उभारण्याची प्रेरणा

Sandeep Deshpande

संदिप देशपांडे

पेशाने स्थापत्य अभियंता,सध्या राजापूर येथे बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत.पर्यटन,समाजसेवा या माध्यमातून काहीतरी करावंया उद्देशाने माय राजापूरमध्ये कार्यरत

Sinkar Sir

दत्तप्रसाद सिनकर

राजापूर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे भौतिकशास्त्राचे शिक्षक.पर्यटन,साहित्य,तंत्रज्ञान यांची आवड

WhatsApp Image 2018-05-05 at 5.54.50 PM

वैभव गार्डी

पर्यटन आणि सामाजिक जाणीवेतून मायराजापूरच्या कामात सहभाग.इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करून सध्या आयसीआयसीआय बँक राजापूर येथे नोकरी