विमलेश्वर मंदिर

श्री विमलेश्वर मंदिर :-
राजापूर रानतळे मार्गे दसूर साटवली मार्गावर :८ कि.मी. वर खिणगिणी गाव लागतो तेथून डाव्या बाजूला तेरवण रस्ता लागतो. तेथून २ कि.मी. वर पेशवेकालीन विमलेश्वर मंदिर आहे. बिनीवाले – पेशवेकालीन सरदार हे राजापूर तालुक्यातील तेरवणचे चिंचाळकर; त्यांनी विमलेश्वर मंदिर बांधले आहे.
माडा, पोफळीच्या बागेत मंदिर असून मंदिराला चिर्‍याची तटबंदी आहे. आतील अंगणातही चिर्‍याची फरशी (Paving) आहे.
मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मुखमंडपासमोर नंदीची आकर्षक व आकाराने मोठी मूर्ती आहे. कौलारू छपरासाठी वापरण्यात आलेल्या वाशांची (Rafter) सुंदर रचना आहे. मंदिराचा परिसर आल्हाददायक व वातावरण आत्मिक शांतीसाठी पोषक आहे.