कातळकडा

कातळकडा धबधबा :-
राजापूर पेट्रोलपंपापासून धारतळेकडे जाणार्‍या रस्त्यावर हर्डी येथे ‘कातळकडा’ धबधबा आहे. हायवेपासून हे अंतर ४.०० कि. मी. आहे. टप्याटप्प्याने पडणारे दुधासारखे पाणी, आजुबाजुला गर्द झाडी यामुळे पावसाळ्यात या परिसराचं सौंदर्य फारच खुलते. पावसाळ्यात पायवाटेने जाऊन धबधब्याखाली आंघोळ करता येते. डोहातील पाण्यात पोहता येते. निसर्गप्रेमींनी पावसाळ्यात या ठिकाणी भेट द्यायलाच पाहिजे.