श्री भार्गवराम मंदिर :-
राजापूर धारतळे मार्गे रत्नागिरी रस्त्यावर राजापूर पासून :१४ कि. मी. अंतरावर डाव्या बाजूला देवाचेगोठणे रस्ता जातो. तेथून ८ कि.मी. अंतरावर भार्गवराम मंदिर आहे.
रस्त्याच्या कडेचा ओढा ओलांडून पलिकडे गेले की चिरेबंदी तटबंदी आहे. आत चिर्याची फरशी बसवली आहे व मध्यभागी भव्य घुमट असलेले भार्गवराम मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना आहे. सभामंडप लाकडी खांबावर चौपाखी छप्पराचा आहे. गर्भगृह प्रशस्त असून त्यावरील शिखर मात्र वेगळ्या धाटणीचे आहे. गर्भगृहात पंचधातूची परशुरामाची मूर्ती आहे. मंदिराच्या समोर असलेल्या गोपूरात भव्य पंचधातूची घंटा आहे.